'सोमेश्वर'च्या सभासदाचे दातृत्व ! पुरस्काराची रक्कम दिली वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सन २०२०-२१ या वर्षामध्ये निंबुत ता बारामती येथील उदय नारायणराव काकडे यांनी एक एकर क्षेत्रात तब्बल १०५.७०० टन ऊसाचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकावला. 
             या सभासदाने मात्र बक्षिसांची मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कम वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी दिली. शेतकऱ्याचे हे दातृत्व पाहून त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. 
          निंबुत येथील प्रगतशील बागायतदार व नींबूत गावचे माजी सरपंच उदयसिंह काकडे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये २६५ या जातीचा ऊस १०५ टन उत्पादन काढल्याने कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, संभाजी होळकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोफणे यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. 
To Top