बारामती ! नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नववीतल्या शाळकरी मुलाची आत्महत्या : क-हावागज गावातील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या  शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील क-हावागज मध्ये घडली. या घटनेमुळे क-हावागज परिसरात शोककळा पसरली आहे. 
               शुभम मोतीराम धोत्रे असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम चे वडील वारले आहेत आणि त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. शुभम गेली काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता. पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. त्यातून निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला.  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.
To Top