सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
निंबुत ता बारामती येथील साहेबराव दादा सोसायटी च्या १११ वी वार्षीक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली यामध्ये सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
साहेबराव दादा सोसायटीची १११ वी वार्षीक सवसाधरण सभा बाबा कमल सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षपदी शामकाका काकडे होते. संस्थेस ब वर्ग मिळाला असुन एकुन नफा १३ लाख २९ हजार झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांस देण्यात आला. संस्थेने ३ कोटी रुपये कर्ज वाटप केले असुन संस्थेची स्वमालकिची इमारत आहे. मंगल कार्यालय व इतर भाडेपठी पासून संस्थेच चांगला नफा मिळत आहे. सोसायटीचे चेअरमन अजित काकडे , यांचासह सचिव योगेश काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे, संचालक अभिजित काकडे, मदन काकडे, भीमराव बनसोडे यांचासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत आभार राजकुमार बनसोडे यांनी मानले .