बारामती ! चार पिढ्यांचे साक्षीदार रामचंद्र सकुंडे यांचे वाघळवाडीच्या विकासात मोलाचे योगदान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
 बारामती तालुक्यातील वाघळवाडी चे रामचंद्र तात्याबा सकुंडे याचे ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव  व सामाजिक कार्यकर्ते सतीश सकुंडे तसेच राजकुमार सकुंडे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले .
       सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रमोद काकडे ,उद्योजक आर एन शिंदे ,पुणे जिल्हा बॅंक संचालक संभाजी होळकर,राजवर्धन शिंदे व संचालक मंडळ तसेच जेष्ठ ग्रामस्थांच्य उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला .
        सकाळी झालेल्या आरोग्य शिबीरात ११७ जेष्ठ नागरीकांची मधुमेह ,रक्तदाब  व अनेक तपासण्या केल्या. तथास्तु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यांना हे शिबिर पार पडले.  गावातील जेष्ठ नागरीक ,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुमारे १५३ जणाना मानचिन्ह ,शाल श्रीफळ व फेटे बांधुन गौरवण्यात आले . कोव्हीड काळात सामाजिक योगदान देणारे  डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार,व क्रिडा क्षेत्रात देशपातळीवर नाव कमावणाऱ्या खेळाडुंचा गौरवही करण्यात आला . वेगवेगळ्या मंदीरासाठी ११० वृक्षांचे वाटप यावेळीसकुंडे कुटुंबीयाकडुन करणेत आला .
      सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी सकुंडे कुटुंबीयाचे सामाजिक योगदान मोठे असुन चार पिढ्या पाहणाऱ्या रामचंद्र सकुंडे यानी विविध संस्थाद्वारे वाघळवाडीच्या विकासात मोठे योगदान असल्याचे सांगीतले.
           प्रास्ताविक मध्ये सतीश सकुंडे यानी आपण वाघळवाडीच्या ग्रामस्थांच्या प्रेमामुळे भारावुन गेल्याचे सांगीतले व जेष्ठ नागरीक व सामाजिक कार्यकर्त्याच्या गौरवाचे भाग्य आपल्याला मिळाल्याचे सांगुन सर्वांचे आभार मानले. स्वागत राजकुमार सकुंडे यानी केले .यावेळी कोल्हापूरचे प्रा एम सी कुलकर्णी यांचे जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज शिंदे तर आभार तुषार सकुंडे यांनी मानले. 
To Top