सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : सुदाम नेवसे
बारामती तालुक्यातील सुपे येथील छत्रपती शिवाजी महाराज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवार दि.३० रोजी पुजा गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेमध्ये संस्थेच्या सभासदांसाठी सर्वानुमते ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे .या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते. ही सभा खेळीमेळीत पार पडत असताना जे संस्थेचे थकबाकीदार सभासद आपली थकबाकी रक्कम दि.३१ डिसेंबर पर्यंत पूर्णपणे एक रकमी भरतील अशा सभासदांना व्याजात ३०टक्के सवलत देण्यात येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव लक्ष्मण चव्हाण यांनी बोलताना दिली. अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेणारी या भागातील पहिलीच संस्था असल्याने या निर्णयाची चर्चा सुपे परिसरात होत आहे. या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष नारायण कदम, सहसचिव दादा भोसले, माजी सभापती पोपटराव पानसरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराव चांदगुडे,बी.के.हिरवे,नंदकुमार चांदगुडे,भगवान चांदगुडे,नारायण धुमाळ,रघुनाथ हिरवे सर्व संचालक व सभासद वर्ग उपस्थित होते.