सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडी उत्रौली ता.भोर येथील सॉलिसिटर प्रसाद सुरेशराव शिंदे यांच्या माध्यमातून गेले दोन वर्षांपासून तालुक्यातील भाविक भक्तांसाठी १ रुपया नाममात्र शुल्क देवदर्शन यात्रेचे नियोजन केले जाते.या देवदर्शन यात्रेत नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभाग घेवून यशस्वीपणे तीर्थयात्रा पार पाडतात. कोविड काळात देवदर्शन यात्रांना खंड पडला होता. या देवदर्शन यात्रेमध्ये साधारण सहा तिर्थक्षेत्रांचे दर्शन करून दिले जाते. यामध्ये देहू, आळंदी, जेजुरी, मोरगांव, नारायणपूर व केतकवळे बालाजी या तीर्थक्षेत्रांचा समावेश असतो सदर यात्रे मध्ये चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय केली जाते. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी यात्रेचे नियोजन केले जाते.सळताच्या आठवड्यात चिखलावडे खुर्द येथील भाविकांनी यात्रेचा लाभ घेतल.आत्तापर्यंतची ही तेरावी यात्रा असून नियोजन सॉलिसिटर जेजुरी देवस्थानचे विश्वस्त प्रसाद सुरेशराव शिंदे हे त्यांच्या वैयक्तिक खर्चातून करीत असतात यात्रेचे संपूर्ण नियोजनाची जबाबदारी राहुल सुरेशराव शिंदे आणि शाम गजानन शिंदे यांच्यावर असते.चिखलावडे खुर्द येथील यात्रेकरुंबरोबर भोर तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, वेनवडी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव शिंदे, चिखलावडे खुर्दचे सरपंच विठ्ठल कोंढाळकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.