सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सह. कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा गुरुवार दि २९ रोजी संपन्न झाली या वेळी मी व्यक्तिगत आरोग्याच्या अडचणी मुळे प्रत्यक्ष हजर राहू शकलो नाही परंतु सभेत नेहमी प्रमाणे सत्ताधारी संचालक मंडळाने आपल्या सोईच्या विषयासाठी पार्टी मीटिंग आणि आपल्या कार्यकर्त्यांचे माध्यमातून नेत्यांना खुश करण्यासाठी असलेल्या चढा ओढीतून नेहमी प्रमाणे संस्थेच्या, सभासदांच्या हितासाठी आवश्यक भूमिका घेण्या ऐवजी केवळ राजकीय सोईसाठी विषय मांडले आणि रेटून मंजुरी मिळवली असल्याचा आरोप भाजप नेते तथा पुणे जिल्हा बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी केला आहे.
याबाबत खैरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे, वास्तविक कारखान्याचे विस्तारीकरण का लांबले मागील हंगामाच्या सुरवातीला सुरू होणारे काम कसे तरी हंगाम संपताना झाले त्यामुळं हंगामात तोडणी वाहतूक खर्चात झालेले नुकसान तोडणी नियोजना मुळे ऊस उत्पादक सभासदांचे झालेले नुकसान यावर कोणतीच चर्चा झाली नाही यापुढे जाऊन विलंबाने झालेल्या कामामुळे काही आर्थिक बोजा वाढला, या बाबत काही चर्चा नाही बाजूच्या कारखान्याने विस्तारवाढ करतानाच विस्तारवादी भूमिका घेत आपल्या कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आपल्या कारखान्याचे स्थापने पासून सक्रिय असलेल्या काही गावांसह १० गावे सामावेशासाठी परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव पाठवला आणि आपण गेली अनेक वर्षे कार्यक्षेत्रातील काही गावातील अनेक लोक आपल्या कारखान्याचे सभासद असताना इतर कारखान्यांना सभासद झाले आपण आक्षेप घेतला नाही, सभासद असताना ऊस इतर कारखान्यांना गाळप करण्यास दिला त्यावर आक्षेप घेतला नाही उलट बाजूचे सहकारी , खाजगी कारखाने नव्याने क्षमता वाढवत असताना विस्तीर्ण असणाऱ्या कार्यक्षेत्राचा विचार करता सभासदांचे हिताचा, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे नेतृत्वातील केंद्र शासनाचे साखर कारखान्यासाठी अनुकूल धोरणास अनुसरून, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून सभासदांचे कडून असलेल्या अमर्यादित पाठिंब्याच्या जोरावर विस्तारवाढ मंजुरी मिळून ती वेळेपूर्वीच करण्या ऐवजी अक्षम्य दिरंगाई झाली असतानाच विलंबाने, जास्तीचा खर्च करून पूर्ण झाले आहे. खरे तर सभासदांचे सरासरी उत्पादन वाढ करताना अतिरिक्त पाण्या मुळे जमिनीचे आरोग्य खालावत आहे.
सहकार हे सभासदांचे पवित्र मंदिर यात राजकारण करू नये हे अपेक्षित यावर काम करत आदर्श काम करण्याची संधी असताना यावर कोणी बोलू नये उलट आपल्या कारखान्याचे हद्दीतील १० गावे शेजारच्या कारखान्याला हस्तातरण करण्याचा ठराव मांडला आणि मांडून तो संम्मत करावा हे गंभीर आहे वास्तविक कोणत्याही सभासदने संस्थेच्या हिता विरोधी काम केले नसेल किंवा मागणी केली नसेल तर त्याचे सभासदत्व रद्द अथवा हस्तातरन करण्याचा अधिकार कोणा व्यक्ती अथवा सभेस नाही याचे भान सत्ताधार्याना नसावे हे दुर्दैवी असून जाहीरपणे विकासावर निवडणुका जिंकत आल्याच्या भाषा वापरणारे अश्या आड मार्गाने कार्यकर्ते केवळ नेत्यांना खुश करण्यासाठी वाट्टेल ते करू शकतात हे माहीत असल्याने, माळेगाव सहकारी साखर कारखाना ची निवडणूक लढवताना होत असलेली दमछाक, पराभव यातून सुटका करून घेण्यासाठी केलेला अट्टाहास आहे. माळेगावच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी मोठ्या प्रमाणावर या विषयाला विरोध करत दहा गावातील लोकांना सभासद करून घेण्यास प्रखर विरोध केलेला दिसून आला आहे त्यामुळे यापुढे तरी सोमेश्वर च्या दहा गावातील कार्यकर्त्यांनी योग्य तो बोध घ्यावा त्यामुळे भागातील सभासदांच्या, संस्थेच्या हितासाठी यापुढे चुकीचे होणारे काम थांबविण्यासाठी आम्ही सहकार न्यायालयामध्ये संस्थेचे सभासद आमचे सहकारी दिलीपराव खोमणे यांचे नावे दावा दाखल केला असून ज्या कोणा सभासदांना याप्रकरणी आपले योगदान देऊ इच्छितात त्या सर्वांना बरोबर घेऊन याविषयी आवश्यक तो सर्व संघर्ष केला जाईल यापुढे सोमेश्वर साखर कारखाना जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वोत्तम होण्यासाठी रचनात्मक काम करत संघर्ष करू आणि सत्ताधाऱ्यांना योग्य जागा दाखवु असे दिलीप खैरे यांनी सांगितले आहे.