सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगातून मंजूर झालेल्या निधीतील एकही रुपया खर्च केला नसल्या प्रकरणी भोर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेने कारवाईचे आदेश काढले आहेत.
केंद्रीय १५ व्या वित्त आयोगातून सन २०२१ -२२ साठी ग्रामपंचायतींना निधी दिला होता.हा निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर जसाच्या तसा पडून आहे. यातील एकही रुपया देगाव, बारे खुर्द ,आंबेघर, आळंदे, हरणस, हरिश्चंद्री, हिरडोशी,पाले,कांबरे खुर्द,किवत, कोळवडी, कुंबळे, मळे, माजगाव, मोरवाडी, नऱ्हे, पेंजळवाडी ,सांगवी हिमा, शिंद,वडगाव डाळ , वाढाने, वडतुंगी, वरोडी बुद्रुक ,वेनवडी ,विरवाडी, येवली या ग्रामपंचायतीने खर्च केलेला नाही.हा निधी वेळेत खर्च करण्यासाठी नुकतीच जिल्हा परिषदेने सुनावणी घेतली व निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींना सक्त सूचना करीत कारवाईचा निर्णय घेतला आहे.