बारामतीच्या पश्चिम भागात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक जयंती विविध उपक्रमाने साजरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामतीच्या पश्चिम भागात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. मुरुम(साळोबावस्ती) येथे उमाजी नाईक तरुण मंडळाच्या वतीने जेजुरी येथून ज्योत आणण्यात आली. ग्रामस्थांनी ज्योतीचे जल्लोषात स्वागत केले. तरुणांनी भंडाऱ्यांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.दोन वर्ष कोरोनामुळे जयंती उत्सवावर बंधने होती मात्र चालू वर्षी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 

           जयंती निमित्त मुरुम येथे मंगळवार(दि.६) रोजी विजय महाराज जाधव यांचा भारुडाचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी(दि.७) जेजुरी येथून ज्योत आणण्यात आली. दुपारी महापुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मिरवणूक पार पडली. गुरुवारी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप आणि स्वागत समारंभ पार पडणार आहे. वडगाव निंबाळकर येथे उमाजी नाईक जयंतीनिमित्त भिवडी( ता.पुरंदर) येथुन पायी आणलेल्या मशाल ज्योतीचे पूजन जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे, राहुल आगम, नंदकुमार जाधव, किशोर साळुंखे, महेंद्र भंडलकर, पांडुरंग घळगे, बबन भंडलकर,सोमनाथ खोमणे, योगेश मदने,भैय्या बोडरे, प्रदिप मदने उपस्थित होते. शासकीय जयंती साजरी होत असल्याने मुरुम, वाणेवाडी, वाकी, होळ, चोपडज, वडगाव निंबाळकर येथे ग्रामपंचायत कार्यालयात नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी सामाजिक संदेश देण्यात आले. याशिवाय तरुण मंडळाच्या वतीने भिवडी, जेजुरी येथून ज्योत आणण्यात आली.
To Top