भोर ! आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-- --- 
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात ठिकठिकाणी भारताला स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवणारे पहिले क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांच्या २३१ व्या जयंतीनिमित्त जेजुरी येथून ज्योत आणून प्रतिमेचे पूजन करीत हजारो तरुणांनी अभिवादन केले.
     नरवीर उमाजी नाईक यांच्या जेजुरी येथे भोर तालुक्यातील हातनोशी (रमोसवाडी), आळंदे, वेनवडी (दत्तनगर) तर शिंद येथील तरुणांनी पुतळ्याचे दर्शन घेवून सासवड-भिवडी मार्गे पायी ज्योत घेवून जल्लोषात स्वागत करीत अभिवादन केले. यावेळी ठिकठिकाणीच्या गावांमध्ये ग्रामस्थ महिला तसेच तरुणांनी मोठी गर्दी केली होती
To Top