सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
भोर : संतोष म्हस्के
दुर्गम डोंगरी भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडेवाडी येथील शिक्षिका श्रीमती सविता नारायण तनपुरे यांना जिल्हा परिषदेचा सन २०२१ -२२ चा देण्यात येणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या धोंडेवाडी या दुर्गम गावात श्रीमती सविता नारायण तनपुरे यांनी यशवंतराव कला क्रीडा महोत्सव अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत सलग दोन वर्ष जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. मराठी राजभाषा दिन निबंध स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक ,यूट्यूब चैनल वर मुलांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, क्यू आर. कोड निर्मिती स्वानंदी शिक्षण या उपक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी केल्य तसेच जिल्ह्यात विविध प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून काम केले आहे .शाळेचे मुख्याध्यापक जयवंत जाधव आणि सहकारी शिक्षिका अनिता पवार यांच्या सहकार्याने कोरोना काळात शंभर टक्के शाळा चालू ठेवून विविध उपक्रम राबवले तसेच भरीव लोकसहभाग जमा केला.भोर तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी माननीय अश्विनी सोनवणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सविता तनपुरे यांचे अभिनंदन केले.