सोमेश्वर रिपोर्टर टीम--- --
सिद्धटेक : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात आज आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अष्टविनायकातील एक स्थान असलेल्या श्री सिद्धटेक ग्रामपंचायत कार्यालयात या निमित्ताने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
येथील कार्यक्रमासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच सर्व उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या वतीने राजेंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सिद्धटेक येथील समाज बांधवांच्या वतीने लवकरच भव्य जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजकांनी बोलताना सांगितले.