सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
भिषण अपघाता मध्ये मृत्यू झालेल्या वाई तालुक्यातील कोंढावळे गावातील २४ वर्षीय असलेल्या.लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर यांना शोकाकुल वातावरणात दि .६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत अग्नी देत असतानाच अपघातात गंभीर जखमी अवस्थेत दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत असलेली अवघ्या पाच वर्षीय आराध्याने प्राण सोडल्याने कोंढाळकर कुटुंबाला मोठा हादरा बसला आहे .
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील अती दुर्गम आणी डोंगराळ भागात असणार्या कोंढावळे गावातील नागरीकांचा काळाने पाठलाग करुन पुणे मुंबई या महामार्गावर गाठुन कोंढावळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असलेले गणेश कोंढाळकर या २२ वर्षीय तरुणाचा आणी २४ वर्षीय तरुण असलेल्या सौ.लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर या महिलेचा झालेल्या भिषण अपघातात दि.६ रोजी जागीच मृत्यू झाला होता .आणी १२ जण गंभीर जखमी झाल्याची
बातमी वाईच्या पश्चिम भागातील गावा गावांन मध्ये वार्या सारखी पसरताच आख्खे जांभळी आणी जोर खोर्यातील ग्रामस्थांना हादरा बसला तब्बल ४० गावे शिवसागरात बुडाली होती. व मुंबई वरुन अंतविधी साठी शवविच्छेदन करुन आणलेल्या दोन्ही शवांना कोंढावळे गावात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अग्नी
देत असतानाच मयत सौ.लक्ष्मी कोंढाळकर यांच्या ५ वर्षीय असलेल्या आराध्या नावाच्या मुलीने देखील ऊपचारा दरम्यान आपले प्राण सोडल्याची बातमी स्मशान भूमीत येवुन धडकल्याने अंत्यसंस्कार समयी आलेल्या शोकाकुल ग्रामस्थांचे आश्रुंचे बांध फुटलेले दिसत होते .मयत आराध्या हि चिमुकली मुलगी अतिशय गोंडस दिसायला देखणी आणी परिवाराची खुपच लाडकी होती काळाने तिलाही सोडली नाही तर तिचा चार वर्षीय लहान भाऊ देखील दवाखान्यात गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूसी झुंज देत आहे.
सौ.लक्ष्मीताईचे पती विठ्ठल कोंढाळकर यांनी गावी पत्नीला अग्नी देऊन पुन्हा जड अंतकरणाने मुंबई येथे आपल्या लाडल्या आराध्याचे अंत्यसंस्कार करण्या साठी तातडीने निघुन गेले .या अभुतपूर्व दुःखद घटनेने वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व गावांन वर शोककळा पसरली आहे .