जावली ! अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या शिक्षकांचा बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने सन्मान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशाला दिशा देवून शैक्षणिक क्षेत्रातील  अभूतपूर्व क्रांतीची बीजे रोवली त्या शिक्षण महर्षि विभूतिच्या कार्या बरोबरच व सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या आठवणीनेच व कार्याने आज जागतिकीकरण करणार्‍या दिशेला आपलेसे करणार्‍या शिक्षक सेवकांच्या पासून अमृत महोत्सव साजरा केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याबाबत बोंडारवाडी धरण कृती समितीच्या कार्यकर्त्यांला मान मिळतो ही खरी शैक्षणिक प्रेरणा असून विद्यार्थ्यांना घडवून आपल्या संस्कारांचा वाटचालीवर शिक्षकांनी दिलेली प्रेरणा महत्वपूर्ण असून पुढील काळातही शिक्षकांचा आदर व आदर्श जपल्यास शैक्षणिकदृष्टय़ा भारतीय लोक जगाच्या बाजारपेठेत आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी सज्ज असेल असे प्रतिपादन बोंडारवाडी धरण कृती समितीचे विजयराव मोकाशी यांनी केले. 
     शिक्षक दिनाचे अवचित्य साधून केळघर मेढा परिसरातील नागरिकांच्या समन्वयातून शिक्षकदिन साजरा करण्यात आला  1940 साली सायकलीवरुण शैक्षणिक कार्य करणाऱ्या व वयाची 75 साजरी करणार्‍या गवडी ता. जावली येथील सेवानिवृत्त शिक्षक. ज्ञानदेव धनावडे यांचा सन्मान  कै . राजाराम नलगे यांच्या निवासस्थानी जाऊन केला तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देवून नवोदित शिक्षक सेवकांना व बोंडारवाडी धरण लाभ क्षेत्रातील विशेषता केळघर परिसरातील मान्यवर शिक्षकांच्या कार्याबद्दल शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला 
यावेळी नारायणशेठ सुर्वे,राजेंद्र धनावडे, पत्रकार मोहन जगताप, आनंदा जुनघरे राम मोरे, श्रीरंग बैलकर,नारायणराव धनावडे व शिक्षणप्रेमी शेखरतात्या गाढवे व मान्यवर उपस्थित होते.
To Top