भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! तालुक्यातील २४४ एकर पोटखराब क्षेत्र लागवडीसाठी योग्य : शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावणार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 भोर  तालुक्यातील ११५ शेतक-यांचे २४४ एकर पोटखराब क्षेत्र लागवडीसाठी य़ोग्य (वहीतयोग्य) करण्यात आले असून या शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावनार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.                                           राज्याच्या महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानात क्षेत्रीय स्तरावरून शेतक-यांना आदेश देण्यात आले आहेत. यामुळे ११५ शेतक-यांची पोटखराब क्षेत्राची जमीन ओलिताखाली आली असून त्याची नोंद सातबा-यावर झालेली आहे. यामुळे संबंधीत शेतक-यांचे लागवडीलायक क्षेत्र वाढून उत्पन्नात वाढ झाली आहे.सातबा-यावर लागवडीलायक क्षेत्र  वाढल्याने पीककर्ज इतर कर्जांच्या टप्यात वाढ झाली आहे. तसेच भूसंपादनाचा मोबदला हा पोटखराबानुसार न मिळता लागवडीसाठी योग्य असलेल्या दराप्रमाणे मिळणार आहे. याशिवाय शासनास मिळणा-या जमीन महसूलामध्ये वाढ होणार आहे. 
    मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात लागवडीसाठीच्या २४४ एकर क्षेत्राची नोंद सातबा-ऱ्यावर  झाली आहे. महसूल विभागाच्या तालुक्यातील भोर मंडलातील सर्वाधिक शेतक-यांच्या ३६ प्रस्तावांना मान्यता दिली असून संगमनेर मंडलातील सर्वाधिक ७६.०५ एकर क्षेत्र लागवडीसाठी करण्यात आले आहे. इतर मंडलातील शेतकरी प्रस्ताव व क्षेत्र पुढीलप्रमाणे कंसात प्रस्तावांची संख्या व क्षेत्र एकरांमध्ये - निगुडघर (३३,१९.४८ एकर) संगमनेर (२४,७६.०६),  भोलावडे (१६,७०.०९), आंबवडे (६, १२.३५) आहे.
                                           
To Top