सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जळगाव सुपे : प्रतिनिधी
जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे येथील हायस्कूल ते जाधव वस्तीकडे जाणारा रस्ता 3 महिन्यापूर्वी झाला असून रस्त्यावर टाकलेली खडी पूर्ण पणे निघाली असून त्याचा त्रास या रस्त्याने नागरिकांना होत आहे.
रस्त्याचे काम अंदाजपत्रका प्रमाणे झाले नसल्याने कमी खडी व मुरमाचा वापर केला आहे तसेच रस्त्याचे रोलिंग देखील व्यवस्थित केले नाही त्यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळा यादी टाकावे अशी मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे विलास जाधव राहुल खोमणे अंकुश भापकर सचिन खोमणे नितीन जाधव अनिल जगताप शांताराम खोमणे ईश्वर जगताप शैलेश शहा आदींनी केली आहे सदर रस्त्यावर टाकलेले वीस लाख रुपये अक्षरशः मातीत गेले असून या कामापुढे चालेले सार्वजनिक बांधकाम विभाग बारामतीचे रुपये वीस लाखाचे काम देखील अशाच प्रकारे चालु अंदाजपत्रका प्रमाणे मुरमाची व खडीची जाडी नसून रस्ता ठिकठिकाणी कमी जास्त रुंदीचा केला आहे बांधकाम विभागाचे उपअभियंता या ठेकेदारास का पाठीशी घालत आहे याची धबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू असून विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री यांना सदर रस्त्याचे काम दाखवल्याशिवाय रस्त्याची गुणवत्ता मिळणार नाही अशी ग्रामस्थांची धारणा झाली असून सुमारे 40 लाखाचा निधी मातीत घातलेल्यांना काळ्या यादीत टाकणेसाठी अजित पवार यांच्याकडे निवेदन देणार असल्याने अनिल जगताप यांनी सांगितले आहे.