Big Breaking ! प्रतिनिधी : दौलतराव पिसाळ ! पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वर ट्रक व इको कारची जोरदार धडक : वाई तालुक्यातील दोघांचा मृत्यू तर दहा जण जखमी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्या जवळ झालेल्या  भीषण अपघातात  वाईच्या पश्चिम भागातील कोंढावळे गावातील एका तरुणा सह तरुण महिलेचाही जागीच मृत्यु झाल्याने व १० जन गंभीर जखमी असल्याने  गावावर शोककळा पसरली आहे . 
         वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढावळे गावातील ग्रामस्थांना  कोपरखैरणे येथे घेऊन  निघालेल्या इको कार आणि ट्रकचा भिषण  अपघात झाला. इको कार मधील प्रवाशां पैकी एक महिला आणि एक तरुण हे जागीच ठार झाले . तर किरकोळ आणी  गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना एमजीएम रुग्णालयात ऊपचारा साठी  दाखल केले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे मारुती इको कारने ड्रायव्हर आणि अन्य 15 जण निघाले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जात असताना कार  माडप बोगद्या जवळ आली असता KA 56 - 2799 हा माल ट्रक रस्त्याच्या कडेला आपला पंक्चर झालेला टायर बदलण्या साठी उभा होता त्याला कारने पाठी मागून जोराची  धडक दिली. धडक एवढी भिषण  होती की, इको कार मधील सर्वच प्रवाशी गंभीर जखमी   झाले .  त्यातील महिला लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर, वय -24 आणी   गणेश बाळू कोंढाळकर, वय -22, रा. कोंढावळे, ता. वाई, जिल्हा - सातारा या दोघांचा  जागीच मृत्यू झाला   तर  इतर १२ जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यातील सहा ते सात जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत त्यांची प्रकृती नाजूक आहे.  रात्री दोन वाजताचे सुमारास घडलेल्या या भीषण अपघाता मुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. इको कार मधील जखमींना बाहेर काढण्या साठी आय आर बी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा  करावी लागली. झालेल्याा या गंभीर अपघाताची  माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणें सोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने   घटनास्थळी दाखल झाले होते. 
       या गंभीर  अपघाताची भीषणता लक्षात घेवुन खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस  निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटना स्थळाला भेट दिली तसेच एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. 
         इको कारचा चालक अंकुश राजाराम जंगम वय - 32  यांने लेनची शिस्त न पाळता, भरधाव वेगाने कार चालवल्याने हा भिषण  अपघात झाल्याचे  कारण प्राथमिक स्वरूपात पुढे आले आहे. पोलीस यंत्रणा या बाबत अधिक चौकशी जरी करत असली तरी, क्षमते पेक्षा जास्त प्रवासी घेऊन आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अति वेगाने कार चालवल्याने झालेल्या या भीषण अपघाताचे स्वरुप पाहता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
To Top