सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर येथे शिक्षक दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वरनगर येथील प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप होते. त्यांनी आपल्या मनोगत म्हटले की, शिक्षक हा समाजाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना विद्यार्थी यशवंत व गुणवंत होण्यामध्ये गुरूंचे असणारे स्थान अधोरेखित केले.
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुचित्रा साळवे यांच्या माध्यमातून प्रशालेतील सर्व शिक्षकांना पुस्तक भेट देऊन शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी जीवनातील गुरूंचे स्थान विशद केले.
संस्कारक्षम विद्यार्थी फक्त गुरुच निर्माण करू शकतात असे विचार त्यांनी व्यक्त केले. सुचित्रा साळवे यांनी देखील गुरूंचे समाजातील स्थान यावर आपले मौलिक विचार मांडले.
या कार्यक्रमास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे प्रशालेचे प्राचार्य मिंड बी. एस. उपप्राचार्य भोसले ए. एस. व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झुरंगे आर.व्ही. व आभार शिंदे वाय.एस यांनी मानले.