सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल दि ६ रोजी सायंकाळी आणि रात्री झालेल्या ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने ओढया नाल्याना पूर आले. नीरा येथील बुवासाहेब नगर मधील १५ तर गडदरवाडी येथील म्हसोबावस्तीमधील पाच घरात पाणी शिरले आहे. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. तर ऊस, सोयाबीन इतर भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत. नगर सातारा रस्त्यावरील नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
काल सायंकाळी व रात्री सोमेश्वरनगर व नीरा परिसराला मुसळधार पावसाने झोडपू न काढले. नीरा बारामती रस्ता, मोरगाव सोमेश्वरनगर रस्ता अनेक ठिकाणी ओढ्याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने सातारा मार्गे नगर ला जाणारी व नगर मार्गे सातारा का जाणारी तसेच बारामती मार्गे नीरा लोणंद व सातारा येथे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.