सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून झुंजार मित्र मंडळ वेताळपेठ (भोर )आयोजित रक्तदान शिबीरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.सलग १० वर्षापासुन रक्तदान शिबीर आयोजण करण्यात येत असून रक्तदाते रक्तदान हे श्रेष्ठदान समजून रक्तदान करीत असतात. शहरातील वेताळपेठ येथील नगरपलिका महाराणा प्रताप शाळा नं.१ येथे रक्तदान शिबीराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,माजी नगरसेवक यशवंत डाळ,माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,सतीश शेटे यांच्या हस्ते झाले.रक्त संकलन भारती हाँस्पीटल ब्लड बँक यांनी केले यावेळी शहराध्यक्ष नितिन धारणे,प्रशांत बहिरट श्रीकांत माने,नितिन सोनवणे,दिनेश काकडे,संध्या जाधव,मयुर भिसे धवल पलंगे उमेश धारणे व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रस्तावीक विठ्ठल शिंदे यांनी मंडळाच्या कार्यक्रमाची महिती दिली.झुंजार मंडळाची १९८५ साली स्थापना झाली असुन मंडळाला ३७ वर्ष पूर्ण झाली असून मागील १० वर्षापासुन रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते.