सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भोर भाद्रपद महिन्यातील गणेश जयंती निमित्त गणरायाच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा विद्युत रोषणाई करीत एलईडी लाईटच्या म्युझिकवर भर दिला असल्याने गणेश मंडळे उजळून गेली आहेत.ही अप्रतिम म्युझिक लाईट पाहण्यासाठी गणेश भक्तांनी दोन दिवसांपासून बहुर शहरात रात्रीच्या वेळी गर्दी केली आहे.
भोर नगरीत यंदा नवयुग मित्र मंडळ बजरंगआळी, गोल्डन गणेशोत्सव मंडळ मंगळवार पेठ ,महाराष्ट्र फ्रेंड्स क्लब मंगळवार पेठ, नवयुग मित्र मंडळ नवीआळी, भोईराज मित्र मंडळ भुईआळी तसेच जवाहर मित्र मंडळ चौपाटी येथील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विद्युत रोषणाईत स्वदेशीचा नारा देत देशी बनावटीच्या एलईडी माळांचा वापर करीत मंडळांमध्ये म्युझिकच्या तालावर चालणारी आकर्षक केली आहे. भोर शहरातील बहुतांशी मंडळांची आकर्षक विद्युत रोषणाई तसेच काही गणेशोत्सव मंडळांचे सामाजिक हलते- फिरते व प्रदूषण विरहित देखावे पाहण्यासाठी ग्रामीण भागातील भाविक भक्त संध्याकाळच्या वेळी गर्दी करीत आहेत. तालुक्यात एक गाव एक गणपती ४१, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २३२, घरगुती गणपती ६ हजार प्रतिष्ठापना करण्यात आली असून गौरी विसर्जन दिवशी १९०,सातव्या -४,आठव्या -१,नवव्या -१ तर द हव्या दिवशी अनंत चतुर्थीला ३५ गणपतींचे विसर्जन होणार असून अधिकारी तालुक्यात पोलीस निरीक्षक -१,उपनिरीक्षक-१, पोलीस अंमलदार -१८ तर होमगार्ड जवान -२८ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याचे भोर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.
दोन वर्षानंतर भाविक-भक्तांमध्ये जल्लोष
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष सर्वच सण, उत्सव यावर बंदी होती. यंदा कोरोनावरील निर्बंध उठल्याने गणेश उत्सव काळात प्रतिष्ठापने पासून भावीक-भक्तांमध्ये मोठा जल्लोष दिसून येत असून धामधुमीत हा उत्सव साजरा होणार आहे.असे जवाहर तरुण मंडळ चौपाटीचे सदस्य तसेच नगरसेवक सुमंत शेटे यांनी सांगितले.
फोटो -भोर नगरीतील नवयुग मित्र मंडळ बजरंगआळी यांनी केलेली विद्युत रोषणाई याचा फोटो ईमेल करून पाठवीत आहे.
संतोष म्हस्के