सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्टा सायंकाळी पाचच्या दरम्यान अवकाळी वळीव पावसाने झोडपला असून ओढ्या नाल्यांना पाणी वाढले आहे.जोरदार पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले.
तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वीसगाव व चाळीसगाव खोरे परिसरात शुक्रवार दि.२ दुपारपासून ढगाळ हवामान तयार होऊन सायंकाळी पाचच्या दरम्यान ढगांचा गडगडाट तसेच विजेच्या कडकडाटासह पाऊस अर्धा तास जोरदार बरसला.या पावसाने ओढया - नाल्यांच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून भात खातरामध्येही पाणी साचले आहे.पावसामुळे भात पीक जोमात येणार असले तरी कडधान्य पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.