भोर ! पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात भोरकर स्त्यावर : नागरिकत्व रद्द कडून कारवाईची मागणी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
पुणे येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया समाजकंटक देशद्रोही गद्दारांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर शिक्षा द्यावी या पार्श्वभूमीवर भोर वासियांनी शहरात देशद्रोह्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत जाहीर निषेध मोर्चा काढला.
              पुणे येथे पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा ंनी देशद्रोही गद्दारांनी दिल्याने भारत वासियांची मने दुखावली गेली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात व भारतात गद्दारांचे देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.तर त्यांच्यावर राष्ट्रगृहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे नागरिकत्व रद्द करावे तसेच कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भोर येथे सोमवार दि.२६ चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नतमस्तक होऊन जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी निषेध मोर्चातील तरुणांनी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना भोर बस स्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निवेदन दिले.यावेळी शेकडो भोर वासिय तरुण तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top