सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
काऱ्हाटी ता. बारामती येथील शुभम संतोष खंडाळे या वीस वर्षीय तरुणाचा नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये पोहत असताना मृत्यू झाला. काल दि. 25 रोजी तो आईसोबत गोधडी धुण्यासाठी कऱ्हा नदी बंधाऱ्यावर नदीपात्रात गेला असताना पोहताना त्याचा मृत्यू झाला.
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे काल दि. २५ रोजी घटस्थापनेच्या पुर्वसंधेस दुःखद अशी घटना घडली. शुभम संतोष खंडाळे हा वीस वर्षाच्या तरुण आपली आई जयश्री खंडाळे यांचा समवेत गोधडी धुण्यासाठी कऱ्हा नदी पात्रातील बंधाऱ्यामध्ये गेला होता. गोधडी धुतल्यानंतर तो व त्याचा मित्र नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये पोहण्यासाठी उतरला. याच दरम्यान पोहताना त्याचा मृत्यू झाला. शुभम आपले शालेय शिक्षणामध्ये शिक्षण सुरू असताना तो त्याच्या वडिलांना वडापावच्या गाड्यांमध्ये, तसेच केरसुणी बनवण्यासाठी मदत करत करायचा.
एक मन मिळाऊ व्यक्ती म्हणून तो गावात सर्व परिचित होता. बारावी नंतर तो पोलीस भरतीपूर्व खाजगी अकॅडमीमध्ये तो सातारा येथे प्रशिक्षण घेत होता. सुट्टी दरम्यान तो आला असताना काल ही दुःखद अशी घटना घडली. घटनेची माहिती समजताच बारामती तहसीलदार विजय पाटील मंडलाधिकारी एस डी.मुळे , गाव कामगार तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली व खंडाळे कुटुंब यांचे सांत्वन केले.