खंडाळा ! प्रशांत ढावरे ! एकीकडे लिलावाची नोटीस तर दूसरीकडे भागभांडवलासाठी नेत्यांचे दौरे : नक्की खंडाळा कारखान्याचे गौडबंगाल काय ?

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद/ प्रशांत म. ढावरे
खंडाळा साखर कारखाना पुर्ण क्षमतेत चालू करणार अशी घोषणा करत आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा तालुक्यातील लोणंदसह परिसरातील ऊस उत्पादक गावात भागधारक वाढविण्यासाठी संपर्क दौरा सुरू केला आहे. 
         अवघ्या काही आठवड्यांपूर्वीच खंडाळा येथील "किसनवीर सहकारी साखर कारखाना" कर्जाच्या बोजात अडकल्याने कारखाना उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्याने बॅंकांनी वेळोवेळी पैसे भरण्यासाठी वसुली नोटिस काढल्या होत्या. परंतु बॅंकांनी दिलेल्या मुदत संपल्यावरही कारखाना पैसे भरण्यात असमर्थ ठरला होता, या कारणाने साखर कारखान्याचा (Sugar Factory Online Auction ) ऑनलाइन लिलाव करण्यात येईल असे बॅंक ऑफ़ इंडिया , वसुली विभाग कोल्हापुर यांनी मागील महिन्यातच स्पष्ट केले होते. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांचे भाग (शेअर्स) बुडणार का वाचणार याबद्दल शेतकरी सभासदांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. 
       खंडाळा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांकडून भागभांडवल उभे करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.  साधारण पंधरा हजार शंभर रूपयांचा एक शेअर घेण्यासाठी गावोगावच्या सोसायटीतून शेतकऱ्यांना आठ टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या प्रचंड कर्जात असलेला कारखाना चालू होईल की नाही याबद्दल शाशंक असल्याने अनेक शेतकऱ्यांचा सध्या हा शेअर घेण्यात रस नसल्याचेच वातावरण तालुक्यातील बऱ्याच सभासदांच्यात असून काही जुने सभासद आपला जुना शेअर पण काढून घेणार असल्याचे सांगत आहेत. तर काही शेतकरी सभासद काही महीने थांबून वेट अ‍ॅण्ड वाॅच ची भूमिका घेत आपला निर्णय लांबणीवर टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. 
To Top