सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बुद्रुक : हेमंत गडकरी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील माळशिकारेवाडी येथे राहणाऱ्या मयुरी अनिल शिंदे या महाविद्यालय युवतीने घरच्या गणपती समोर पारंपारिक स्वयंपाक घराचा देखावा साकारला आहे. यामध्ये गौरी जात्यावर दळण दळताना व चुलीवर स्वयंपाक करताना दाखवल्या आहेत.
मयुरी अनिल शिंदे असे हा देखावा साकारणाऱ्या महाविद्यालयीन युवती चे नाव आहे. मयुरी सध्या शारदानगर येथील कृषी महाविद्यालयात कृषी विज्ञान शाखेत शिकत आहे. कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतचे विद्यमान कार्यक्षम सदस्य अनिल शिंदे यांची ही कन्या आहे.
या देखाव्यात जुन्या काळातील स्वयंपाक घर साकारले आहे. यामध्ये एक गौरी पारंपारिक पद्धतीने जात्यावर दळण दळत आहे. तर दुसरी गौरी चुलीवर स्वयंपाक करत आहे. या देखाव्यात जुन्या काळातील तांबे व पितळाच्या भांड्यांची आरास केली आहे. चुल ही जणू पेटली असल्याचे दिसत असून जात्यावर दळण दळत असताना जात्यावरील गाणी सुरू असल्याने जुन्या काळाची अनुभूती येत आहे. तर गणपतीसाठी ही पर्यावरण पूरक सजावट केली आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला मोठी गर्दी करत आहेत. मयुरीच्या या देखाव्याचे परिसरात कौतुक होत आहे.