सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दुर्गम-डोंगरी भागासह शहरात कोरोना काळानंतर दोन वर्षांनी उत्साहात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाली .नंतर दोन दिवसांनी गौराईचे आगमन झाले होते.या गौराईंचे विसर्जन महिलांनी मोठ्या जल्लोषात लक्ष्मी घेत केले.
मिनी कोकण समजणाऱ्या भोर तालुक्यात गौराई गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने भाविक- भक्तांना हा गौराई -गणपती सण साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा कोरोनावरील निर्बंध उठल्याने भाविक भक्तांनी जल्लोष करीत सण साजरा केला. मागील दोन दिवसांपूर्वी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. महिलावर्गाने गौराई समोर अनेक विविध प्रकारचे सामाजिक तसेच प्रदूषण विरहित देखावे तयार केले होते. सोमवार दि.५ या गौराईंच्या लक्ष्मीचे माका,झेंडू फुल,आवळा,भोपळ्याचे फुल,हराळी असे विविध झाड वेळी,फळे घेवून विधिवत पूजन करून लक्ष्मी घेत गावोगाच्या महिलांनी एकत्रित येत गौराईंना निरोप दिला.
फोटो - गौराईच्या लक्ष्मी घेत विसर्जन करतानाचा फोटो पाठवीत आहे.