सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या या शाखेतील प्रथम मुलांना हे मोठे यश संपादन केले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यामध्ये सहभाग घेतलेल्या १२ पैकी पाच विद्यार्थी यशस्वी झालेत.
मोरगाव येथे विद्यालयातील कु. वृषाली मनोहर तावरे या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून तिला केंद्र सरकारची NMMS ची शिष्यवृत्ती मिळाली तसेच कु. दिया दशरथ थोरात हिला सारथी संस्थेमार्फत देण्यात येणारी सारथी शिष्यवृत्ती मिळाली असून कु. अदिती गिरमे ,कु.गौतमी गायकवाड व चि.मयूर बनकर या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे.
या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यालयाचे प्राचार्य कैलास गिरमकर सह परिवेक्षक श्री बाळकृष्ण सुतार , विभाग प्रमुख निलेश गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक राजाराम गोळे , अशोक लडकत, तुषार माथने यांनी विशेष परिश्रम घेतले.