सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील अनाथांचा दाता समजले जाणारे माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी शहरातील गोरगरीब १ हजार ७०० नागरिकांना दिवाळी फराळ, एक साडी,एक शर्ट व काही रोख रक्कम दिवाळी भेट दिली.
आवारे गेले दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवीत असून अनेक अनाथांना ते धीर देत आलेले आहेत.तर दर महिन्याला १ हजार ७०० लोकांना त्यांच्याकडून जेष्ठ नागरिक म्हणून रोख स्वरूपात पेन्शन दिली जाते. पुढील काळात २०० लोकांसाठी अनाथ आश्रम काढण्यात येणार आहे तर गोशाळा बांधण्यात येणार असल्याचे रामचंद्र आवारी यांनी सांगितले.दिवाळी भेट देताना भोर नगरपालिका नगराध्यक्षा निर्मला रामचंद्र आवारे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.