सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
उत्रोली ता. भोर येथील शेतकरी सदाशिव अनंत शिवतरे यांच्या माळरानावर चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गाईच्या अंगावर वीज पडून गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.२० दुपारच्या दरम्यान घडली.
शेतकरी सदाशिव शिवतरे हे गाईंना चारण्यासाठी गावाच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या डोंगर माळावरती घेऊन गेले होते.दुपारच्या दरम्यान ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस सुरू झाला.अर्धा तास सुरू होता या पावसात माळावर चालणाऱ्या गाईच्या अंगावर वीज कोसळली यात गाईचा जागेवरच मृत्यू झाला.साधारणता या गाईची किंमत ९० हजार असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गात कडून होत आहे.