सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येणाऱ्या गळीत हंगामात सोमेश्वर कारखाना १५ लाख टन ऊसाचे गाळप करणार असून त्यासंदर्भात ऊसतोडणी कामगार व ऊस वाहतूकदार यांच्याशी करार झाले आहे. येणाऱ्या १५ तारखेला ऊस गाळप सुरू करण्याचा संचालक मंडळाचा माणस असल्याचे मत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या हंगामातील ६१ व्या बॉयलर अग्नीप्रदीपन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व रोहिणी जगताप तसेच उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर व मनीषा होळकर या उभयतांच्या हस्ते अग्नीप्रदीपन पार पडले. यावेळी 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे येणाऱ्या हंगामात ४० हजार ७८८ एकर ऊसाची नोंदणी झाली असून सोमेश्वर चालू गाळपास १५ लाख मे.टन उसाचे गाळप करणार असल्याचे सांगत हंगामासाठी सर्व करार पूर्ण झाले असून ४३६ ट्रक- ट्रॅक्टर, ८६० बैलगाडी, २६९ डंपींग आणि १३ हार्वेस्टरच्या माध्यमातून वेळेत गाळप करू असे जगताप यांनी सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष शहाजी काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे,जेष्ठ सभासद नारायण निगडे, सुरेश जेधे, मोहन जगताप, विजय काकडे, हिंदुराव काकडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, शैलेश रासकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषीकेश गायकवाड, तुषार माहूरकर, हरिभाऊ भोंडवे, प्रवीण कांबळे, प्रणीता खोमणे, सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड यांच्यासह सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.