वाई ! मांढरदेव येथे नवरात्र उत्सवाची सांगता : पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे उत्सव शांततेत पार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
मांढरदेव येथे दिनांक २६ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवास भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोविड काळात दोन वर्षे नवरात्र उत्सव होऊ शकला नव्हता. म्हणून या वर्षी भाविकांनी देवी दर्शनास खूप गर्दी केले होती. देवस्थान ट्रस्ट ने केलेल्या भविनांसाठी सोई आणि पोलीस उपअधीक्षक डॉ. शितल जानवे, खराडे यांनी गर्दीचे केलेले योग्य नियोजन या मुळे खूप गर्दी होऊन देखील नवरात्र उत्सव निर्विघ्न पणे शांततेत पार पडला.त्यामुळे भाविकांचे सुलभ दर्शन होण्यास मदत झाल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. त्या मुळे सर्वच स्तरातून पोलिसांचे प्रशासनाचे तसेच देवस्थान ट्रस्टचे,ग्रामस्थ व भाविकांकडून कौतुक केले जात होते.आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीचा दिवशीच आरती घेण्याचा मान वाई स्टेशन च्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे यांना देण्यात आला. आणि त्या नंतर देवीचा घट हालवून नवरात्रीची सांगता करण्यात आली.
To Top