सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिरोळ- प्रतिनिधी
दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिरोळ शहरासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे नव्याने स्थापन झालेली आपली नगरपालिका त्यांच्या माध्यमातून सुरू असलेले काम व आपण वेळोवेळी केलेले सहकार्य यामुळे शिरोळ शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे असे उदगार माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, येथील ईदगाह मैदानावरील सांस्कृतिक सभागृहाच्या पायाभरणी व धनगर समाज स्मशानभूमी लोकार्पण सोहळा समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील होते, यावेळी बोलताना यड्रावकर पुढे म्हणाले की मुस्लिम समाजाने माझ्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत नेहमीच योगदान दिले आहे, त्यांचे सहकार्य कदापि विसरता येणारे नाही, मुस्लिम समाजाबरोबरच सर्व समाजाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सतत समाज बांधवांच्या पाठीशी राहीन शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण असून आदर्श शिरोळ करण्याचा आमचा मानस आहे,असेही आमदार यड्रावकर यावेळी म्हणाले
शासन आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये खर्चाच्या सांस्कृतिक सभागृहाचा पायाभरणी शुभारंभ व धनगर वाडा येथे सुमारे 25 लाख रुपये खर्चाची संरक्षक भिंत शेड आणि पेविंग ब्लॉक पूर्ण झालेल्या अद्यावत स्मशानभूमीचे लोकार्पण माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलताना पुढे म्हणाले स्वर्गीय सारे पाटील साहेब व नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यामुळे मला मुस्लिम बांधवांची सेवा करता आली हे मी माझे भाग्य समजतो शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण आहे, मुस्लिम बांधवांच्या साठी अद्यावत असे सांस्कृतिक सभागृह बांधून देत आहोत हे काम शाश्वत मजबूत आणि टिकाऊ झाले पाहिजे कारण बाहेरून येणाऱ्या पाहुण्याने देखील सांस्कृतिक सभागृह पाहून कौतुक केले पाहिजे असे सुसज्ज बांधकाम झाले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले या ईदगाह मैदानाकडे मुख्य रस्त्यापासून आत येत असताना रस्ता खराब आहे तो देखील डांबरीकरण केला जाईल असे सांगितले शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायमपणे शिरोळकरांसोबत असेन विविध विकास कामाने शिरोळचाचा चेहरा मोहरा बदलून कायापालट करण्याचा इरादा असल्याचे त्यांनी सांगितले, धनगर समाज स्मशानभूमीसाठी मिस्त्री परिवारातील रसूल साहेब मिस्त्री व मोहम्मद मिस्त्री यांनी आपली जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी या परिवाराचे कौतुक केले, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांच्या हितासाठी सार्वजनिक कामावर भर दिला आहे तीच परंपरा आता नगरपालिकेच्या माध्यमातून आणि डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या सहकार्याने हा विकासाचा रथ पुढे नेत आहोत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळचे कोणतेही काम घेऊन गेले तरी तातडीने ते मंजूर करून काम मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा विशेष वाखाणण्याजोगा आहे, शिरोळच्या विकासासाठी अधिकाधिक कामे हाती घेण्यात येतील त्यांना जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही नगराध्यक्ष पाटील यांनी केले प्रारंभी स्वागत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सिकंदर बागसार यांनी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्व. सारे पाटील यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी मुस्लिम समाज्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत हे सांगताना आम्हा समाज बांधवांना विशेष अभिमान वाटतो असे सांगून त्यांनी समाजाच्या विविध अडचणी मांडल्या यावेळी उपनगराध्यक्ष कमलाबाई शिंदे, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, नगरसेवक राजेंद्र माने योगेश पुजारी, इमरान अत्तार, तात्यासो पाटील, एम.डी. शेख, एम. एस. गवंडी, मजीद अत्तार,बाळू शेख, फत्तेलाल मेस्त्री, परवेज मेस्त्री, आयुब मेस्त्री, मीरासो मुजावर, जब्बार नालबंद, इम्तियाज मोमीन, शमू शेख, आबुज कूरणे, जैनुद्दीन नदाफ, मुल्ला सर, रसूल मोमीन तोहीद मोमीन हैदर मेस्त्री नगरसेवक प्रकाश गावडे, प्रदीप चव्हाण, अर्जुन काळे, विजयसिंह माने देशमुख, सुभाष माळी, जनार्दन कांबळे, सुरज कांबळे, प्रतिक धर्माधिकारी आण्णा पुजारी, विष्णु पुजारी नेमिनाथ पुजारी शिवाजी पुजारी भीमा पुजारी बबन पुजारी आकाराम पुजारी अरुण कणके राजू बरगाले शंकर पुजारी सुखदेव पुजारी पवन गुपचे आदी मान्यवर उपस्थित होते.