Baramati ! बाबुर्डीच्या सरपंचाचा एक मेसेज अन्...! अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे बाबुर्डी-मोरगांव रस्ता एका दिवसात झाला चकाचक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बाबुर्डी-मोरगांव रस्त्याच्या कडेला वेड्या बाभळी जास्त वाढल्याने शेतकऱ्यांना जनावरांचा चारा नेताना दोन वाहनांना त्रास होत असायचा, रात्रीच्या वेळी काट्यांच्या अडोशाला दबा धरून दुचाकी अडवून मारहाण, चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काट्या काढणे अत्यंत गरजेचे होते. याविषयी बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी बारामती बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता श्री.अमोल पवार यांना मेसेज पाठवल्यानंतर त्यांनी तातडीने लगेच दुसऱ्या दिवशी काट्या काढण्यासाठी पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले. त्यांच्या कार्यतत्परतेचे बाबुर्डीकरांनी स्वागत केले.
      बाबुर्डी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी बाबुर्डी-मोरगाव रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काट्यांमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती, रात्रीच्या गाड्या अडवून चोरीच्या घटनाही घडायला लागल्या होत्या यासंबंधी बारामती बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता श्री.अमोल पवार साहेबांना मेसेज केल्यानंतर तत्परतेने त्यांनी पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले याबद्दल त्यांचे बाबुर्डीकरांकडून मनःपूर्वक आभार.
To Top