भोर-आंबाडखींड मार्गावर दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर-आंबाडखिंड मार्गावरील भाबवडी ता. भोर येथे रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी गाडी आपटून खानापूर येथील एक महिला दुचाकीवरून पडून डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाली होती.जखमी महिलेस उपचारासाठी पुणे येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली.
      भोर-आंबाडखिंड मार्गावरील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याच्या आजाराचा त्रास होऊ लागला आहे. लवकरात लवकर या मार्गावरील खड्डे भरण्यात यावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
To Top