सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिन देशभर साजरा होत असताना भोर तालुक्यात एकता दौडचे आयोजन करून एकता दौड चौपाटी (भोर) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास हार अर्पण करून भोर तहसील कार्यालयापर्यंत उत्साहात काढण्यात आली.
भारत माता की जय ,वंदे मातरम अशा घोषणा देत एकता दौड भोर शहरातून काढण्यात आली.यावेळी तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार मनोहर पाटील ,नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, हावलदार दत्तात्रेय खेंगरे, सर्कल टी. एस.लहारे, सुनील धर्माकांबळे,तलाठी,कोतवाल व छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षक संतोष घोरपडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.