सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील साद संवाद स्वच्छता ग्रुप आणि वाघळवाडी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी किल्ले स्पर्धेत वाणेवाडी येथील शिवेंद्र,शिवम,ईश्वरी भोसले ग्रुप यांच्या हरिहरगड ला प्रथम तर वीर महेश जगताप आणि ग्रुपने किल्ले मुरुड जंजिरा या किल्ल्याला द्वितीय क्रमांक मिळवला तसेच सार्थक सचिन भोसले आणि ग्रुप किल्ले पन्हाळा या किल्ल्याने तृतीय क्रमांक पटकावला. याच किल्ल्यांनी वाघळवाडी येथे भरवलेल्या किल्ले स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
---------------------------
वाणेवाडी येथे किल्ले स्पर्धेतील विजेते-------
1)किल्ले हरिहररगड
शिवेंद्र,शिवम,ईश्वरी भोसले ग्रुप
2)किल्ले मुरुड जंजीरा
वीर महेश जगताप आणि ग्रुप
3)किल्ले प्रतापगड
पृथ्वीराज भोसले, सार्थक भोसले
4)किल्ले पन्हाळा
सार्थक सचिन भोसले आणि ग्रुप
5)किल्ले मुरुड जंजीरा
त्रिमूर्ती ग्रुप
उत्तेजनार्थ
1)श्रेया,शौर्य सावंत
2)दर्शन अनिल यादव
3)प्रणव शिंदे
4)शंभुराजे सालूंके
छोटा गट
1) किल्ले राजगड
शौर्य मनजीत कोंडे
2)किल्ले मल्हारगड,शिवराज नीलेश बांदल
3)किल्ले मुरुड जंजीरा सिद्धिराज नितिन जगताप
4)माऊली सिद्धेश गायकवाड
5)आर्यन नवनाथ भोसले
हे सहावे वर्ष असून या स्पर्धेत ४० जणांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी स्पर्धकांना'शिवाजी कोण होता' हे पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी डॉ. अमोल जगताप, श्री.युवराज खोमणे (पत्रकार दै. पुढारी), श्री.अशोक भोसले सर, कु.सायली जगताप,चि. प्रणय जगताप यांचे विशेष सत्कार करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साद संवादचे सदस्य ओंकार जाधव, नयन जगताप,आर्यन जगताप,सार्थक जगताप,पार्श्व शहा,अंकित जगताप,प्रणय जगताप,विवेक जगताप,विश्वजित जगताप,ओम जगताप,ओम भोसले, शुभम जगताप,आशुतोष खराडे,प्रतीक जगताप,ऋषिकेश सावंत,प्रथमेश सावंत, कुणाल नांदखिले, सिद्धांत जगताप,या तसेच साद संवादच्या ज्येष्ठ सदस्यांनी प्रयत्न केले.
किल्ले स्पर्धेचे परीक्षण श्री.मनोज दीक्षित व त्यांच्या टीमने केले.किल्ले स्पर्धेचे परीक्षण श्री.मनोज दीक्षित व त्यांच्या टीमने केले.
तसेच वाघळवाडी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी किल्ले स्पर्धेत वाणेवाडी येथील प्रथम क्रमांक. शिवराम भोसले (वाणेवाडी)
द्वितीय क्रमांक . यशराज जगताप (वाणेवाडी)
तृतीय क्रमांक. सार्थक भोसले (वाणेवाडी)
चतुर्थ क्रमांक. मयुर सकुंडे (वाघळवाडी)
पाचवा क्रमांक. संदिप खानावळ(वाघळवाडी) यांनी पारितोषिक पटकावले.