सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
अष्टविनायक प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश बबन तावरे यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
अष्टविनायक तीर्थस्थानामुळे मोरगाव ग्रामपंचायतला विशेष महत्त्व आहे. येथे गेली दोन महिन्यापासून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदाच्या निवडी बाबत गावात जोरदार चर्चा सुरू होती. यापूर्वी या तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष माजी सरपंच पोपटराव तावरे यांना संधी मिळाली होती.यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज नव्याने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
मोरगाव येथील ग्रामसभेत आज मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग होता. ग्रामपंचायत सभागृह यावेळी विशेष ग्रामसभा पार पडली.यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा झाली. यावेळी सरपंच निलेश केदारी उपसरपंच संतोष नेवसे सह माजी सरपंच पोपटराव तावरे ,दत्तात्रेय अण्णा ढोले, मोरगाव ग्रामपंचायत चे सर्व सदस्य उपस्थित सभा पार पडली.एकमताने प्रकाश तावरे यांच नाव समोर आले.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मोरगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीस हवालदार वाघोले सह पोलीस नाईक लोंढे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडीनंतर प्रकाश उर्फ पप्पू तावरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.