बारामती ! तो दरवर्षी येतो ...! आणि 'बारामती'करांना चवदार भजी देतो : 'बारामती'करांनी साजरा केला तुकारामच्या हॉटेलचा पंचविसावा वर्धापनदिन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिठ्ठीचा पोरगा ... नुकतंच मिसरुट फुटलेलं ...हॉटेल व्यवसायाच् स्वप्न पाहतो आणि ते सत्यातही उतरवतो. 
         कॉलेज पूर्ण करत पिठ्ठी गावात राहणारा तुकाराम खिलारे हा छोटंसं हॉटेल टाकतो. हॉटेल सांभाळत पुढील महाविद्यालयीत शिक्षणही पूर्ण करत पदवीधर होती. मात्र नोकरी करायची नाही हाच व्यवसाय पुढे वाढवायचा ही गाठ मनाशी बांधून १९९७ साली सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडीसाठी येणाऱ्या ऊसतोडणी कामगारांबरोबर तुकाराम आपला भाऊ युवराज खिलारे बरोबर येतो. नवखा पोरगा...गजबजलेल्या सोमेश्वरनगर सारख्या भागात बुजायला लागतो. ओळखीने ओळखी वाढू लागतात. ऊसतोडणी कामगार, मुकादम, ऊस वाहतूकदार, स्थानीक नागरिक, कारखान्याचे संचालक, पोलीस, पत्रकारांना तुकारामच्या हॉटेलच्या भज्यांनी भुरळ घातली होती. तुकारामच्या तोंडातला गोडवा, भजी, पोहे आणि चहामध्ये उतरू लागला. आणि थोड्याच कालावधीत तुकाराम ने सर्वांना आपलंसं केलं. तो आता सात महिन्यांसाठी का होईना इथला महत्वाचा घटक बनला होता. 
      तुकाराम स्वतः पदवीधर आहे, मोठा मुलगा सिव्हिल इंजिनिअर,  दुसऱ्या मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिक्षण घेत आहे तर मुलीने नुकतेच दहावीत ९२ टक्के गुण संपादन केले आहेत.
        आज वर्धपानदिन कार्यक्रम प्रसंगी सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड, सपोउनि योगेश शेलार, वाहतूक संघटनेचे कैलास मगर, प्रभाकर जगताप, प्रदीप जगताप, सागर गायकवाड, निलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top