सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकरी साखर कारखान्यावरील हमाल काम करणाऱ्या एकाने घरापुढील वडाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
अविनाश पेरनाथ दरेकर वय ३२ मूळगाव बेदपूर ता. पाटोदा जि. बीड असे आत्महत्या केलेल्या हमालाचे नाव आहे. आत्महत्या चे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास सोपनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि योगेश शेलार करत आहेत.