सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात खरिपातील कडधान्य पिकांची कापणीची कामे उरकली असून शेतात सध्या रब्बीतील ज्वारी,कर्डई,पावटा या पिकांची पेरणी सुरू असल्याने सर्जा राजाच्या नावानं शिवार दुमदुमून गेला आहे.
तालुक्यातील शेतकरी खरिपातील पिकांच्या पेरणीच्या लगबगीत असून सकाळी शिळूप्याच्या वेळेत शेतात पेरणी करीत आहेत.तालुक्यात बैल जोडीचा अभाव असला तरी वेळेनुसार बैल जोडीच्या साह्यानेच पिकांची पेरणी केली जात आहे. तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करतानाचे चित्र आहे.तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या भात कापणीची कामे सुरू असल्याने शेतकरी शेती कामाची व्यस्त आहेत.
-----------------------------
मशागतीचा खर्च वाढता
शेतात खरिपातील कडधान्य पिके असताना सतत पडणाऱ्या पावसामुळे खरिपातील पिके तर वाया गेलीच परंतु शेतामध्ये सध्या गवत, वेली खूप वाढल्याने मशागतीचा खर्च नाहक वाढला आहे असे खानापूर येथील प्रगतशील शेतकरी साहेबराव थोपटे यांनी सांगितले.