सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेने राजीनामा न ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासास्वीकारल्याने कोर्टात धाव घेणाऱ्या ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र ऋतुजा लटके यांना द्या, असे आदेश कोर्टाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्ण विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने राजीनामा न स्वीकारल्याने कोर्टामध्ये धाव घेणाऱ्या ऋतुजा लटके यांना उद्या दि. १४ रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाचे आदेश हे आदेश होणेकामी मुंबई हायकोर्टाचे सीनियर वकील विश्वजीत सावंत बारामतीचे नींबूत गावचे सुपुत्र मुंबई हायकोर्टातील वकील वीरधवल प्रमोद काकडे प्रभाकर जाधव व निखिल पाटील यांनी काम पाहिले.