सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील धोम धरणाच्या लगत असलेल्या निर्जनस्थळी वाई तालुक्यातील एका गावातील 17 वर्षाच्या युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी आकाश प्रवीण पोळ (वय 22, रा. धोम) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्यास अटक करण्यात आली नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावातील पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश पोळ याचा वाढदिवस असल्याने त्याने त्या युवतीला आपण फिरायला जावूया असे सांगून गणपती घाटावरुन दुचाकीवर बसवून धोम धरणाच्या जवळ असलेल्या निर्जन स्थळी घेवून गेला. तेथे दुचाकीवरुन खाली उतरवत झाडीत ओढत घेवून गेला. तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे तुला काही होणार असे म्हणून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरच्यांना जीवंत सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे करत आहेत.