सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
दिवाळी तोंडावर येऊन ठेपल्याने राजगड सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक तसेच बिगर ऊस उत्पादक १६ हजार सभासदांना साखर वाटप ७ केंद्रांवर सुरू केली असल्याची माहिती राजगडचे संचालक उत्तम थोपटे यांनी दिली.
राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली नसरापूर, वेल्हा,अनंतनगर निगडे (साखर कारखाना) सारोळा ,भोर ,शिरवळ ,भादे अशा सात केंद्रांवर ऊस उत्पादकांना प्रत्येकी १५ किलो तर बिगर ऊस उत्पादक सभासदांना प्रत्येकी ९ किलो याप्रमाणे शुक्रवार दि. १४ ते शनिवार दि.२२ ऑक्टोबरपर्यंत साखर वाटप केली जाणार आहे असेही थोपटे म्हणाले.यावेळी संचालक सुभाष कोंढाळकर, अभिषेक येलगुडे,अंकुश चौधरी, बाजीराव नांगरे, बाळूआप्पा थोपटे ,दत्तात्रेय गावडे ,पोपट मालुसरे, विलास मांढरे ,चंद्रकांत शिवतरे ,संजय साळवी ,विजय थोपटे उपस्थित होते.