सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
खंडोबाचीवाडी ता बारामती येथील सौदामिनी महिला बचत गटाने एकूण १८ सदस्य महिला असून त्यांनी येणाऱ्या दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप केले.
यामध्ये एक तेल डबा, पाच किलो रवा, पाच किलो हरभरा डाळ ,पाच किलो मैदा, दोन किलो खोबरे अशा साहित्यांचे वाटप केले असून महिलांना संघटित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला असून बचत गटाच्या अध्यक्षा सुशीला लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला, असून त्यांनी सर्व महिला सदस्यांना दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या..