भोर ! संतोष म्हस्के ! ......अखेर सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीत सापडला

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडे हे बुधवार पासून बेपत्ता होते.मात्र त्यांची चार चाकी गाडी निरा नदीवरील पुलाशेजारी उभी असल्याने घोरपडे यांनी नीरा नदी पात्रात आत्महत्या केल्याचे दाट शक्यता असतानाच शोध कार्याच्या काही तासांनी घोरपडे यांचा मृतदेह शुक्रवार दि.१४ नदीपात्रात सापडला.
      सहकारी संस्था पुणे येथे सहसंचालकपदी कार्यरत असलेले शशिकांत घोरपडे वय-४८ रा. गोखले नगर पुणे बुधवार दुपारपासून बेपत्ता होते. त्यांचे हरवल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात गुरुवारी देण्यात आली होती.तपासाअंती घोरपडे यांनी  निरा नदी पात्रात उडी मारल्याची गृहीत धरून शिरवळ व राजगड पोलिसांनी शोध कार्य सुरू केले होते. सारोळे फुलाच्या परिसरात सुमारे ४५ जणांच्या साह्याने ही शोध कार्य सुरू होते.अखेर शुक्रवार दि. १४ घोरपडे यांचा मृतदेह आकाराच्या दरम्यान नदी पात्रात सापडला.आत्महत्येचे कारण अजूनही समजले नाही.
To Top