खूशखबर ! तिरुपती बालाजी मशरूमच्या कामगारांना दिवाळीची भेट : कंपनीने केली तब्बल एवढी पगारवाढ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील तिरुपती बालाजी मशरूम कंपनीतील महिला कामगारांना ३८ टक्के तर पुरुष कामगारांना २५ टक्के पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कंपनीचे संचालक आर एन शिंदे यांनी ही माहिती दिली. 
            आज कंपनीतील ५५० कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणाकिट चे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीच्या संचालिका आशालता शिंदे, कंपनीचे सीओई संजय शिंदे, अक्षय शिंदे फाउंडेशनचे सदस्य योगेश सोळष्कर, बाबूलाल पडवळ, संतोष शेंडकर, महेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी महिला कर्मचाऱ्यांना २०० रुपये प्रतिदिन असणारी हजेरी २७५ रुपये करण्यात आलेली आहे तर पुरुषांना प्रतिदिन ३०० रुपये असणारी हजेरी ३७५ रुपये करण्यात आलेली आहे. तसेच कंपनीतील कामगारांना दिवाळीनिमित्त २१०० रुपयांच्या किराणा किट चे वाटप करण्यात आले. किराणा किट वाटपाचे कंपनीचे हे सातवे वर्ष आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित चव्हाण यांनी केले तर बाबूलाल पडवळ यांनी आभार मानले. 
To Top