सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर व फलटण तालुक्यातील दत्त इंडिया कारखान्यावरील ऊस वाहतुकदारांनी करार केलेल्या ऊसतोड टोळ्या आल्याचं नसल्याने तब्बल ४० वाहतुकदारांना चार कोटींचा फटका बसला आहे. मुकदामांना फोन केले असता ते स्विच ऑफ लागत असल्याने दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येन दिवाळीत ऊस वाहतुकदारांना शिमगा करण्याची वेळ आली आहे.
वाहतुकदार ऊसतोड टोळ्यांशी करार करताना टोळीचा मुकादम यांच्याशी व्यवहार केला जातो. उचलीची रक्कम आरटीजीएस अथवा चेकने दिली जाते. तसेच या व्यवहाराची नोटरी देखील केली जाते. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या संख्येनुसार १० लाख ते १७ लाखांपर्यंत उचल दिली जाते. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून देखील या टोळ्या पळून जातात. यासाठी राज्य शासन, साखर आयुक्त तसेच साखर कारखान्यानी काही ठोस पावले उचलण्याची मागणी वाहतुकदारांनी केली आहे बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व फलटण तालुक्यातील श्री दत्त शुगर या कारखान्यावरील ऊसतोड करणाऱ्या जवळपास चाळीस टोळ्यांनी ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतुकदारांना तब्बल चार कोटी रुपयांचा गंडा घालत पलायन केले आहे. राज्य शासनाने १५ ऑक्टोबर ही राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता कारखादारांनी कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पूर्ण केली आहेत. तसेच ऊस तोडणी यंत्रणेबाबत देखील करार पूर्ण केले आहेत. मात्र परतीच्या पावसाने ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर ला ऊस गळीत हंगाम चुकवला असून रोज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे साखर हंगाम लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४२ हजार एकरांवरील १६ लाख टनाच्या आसपास गाळापासाठी ऊस उपलब्ध आहे. गेल्याच वर्षी सोमेश्वर कारखान्याने कारखान्याचे विस्तारीकरण केल्याने यावर्षी वेळेत ऊस गाळपाचा मार्ग काहीसा सुकर होणार आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्यासाठी कारखान्याने
४३६ ट्रक- ट्रॅक्टर, ८६० बैलगाडी, २६९ डंपींग आणि १३ हार्वेस्टरशी करार केले असून सर्वांना ऍडव्हान्स देखील दिले आहेत. कारखान्याने ४३६ ट्रक ट्रॅक्टर यांच्याशी केल्या गेलेल्या ऍडव्हान्स पोटी कारखाना प्रत्येक वाहनाला ५ लाखांची उचल देत असतो. ऊस वाहतूकदार यामध्ये पदरचे ५ लाख ते १२ लाख रुपये टाकून पुढे ऊसतोड टोळ्यांशी करार करत असतात. यामध्ये बीड आणि चाळीसगाव या जिल्यातील ऊसतोडणी कामगारांचा समावेश आहे. ऊस वाहतूक करणारे शक्यतो शेतकरीच असतात. कारखान्याने दिलेल्या उचलीमध्ये पदरचे सात ते बारा लाख बँकांचे अथवा पतसंस्था चे कर्ज काढून वेळप्रसंगी सोने नाणे घाण ठेवून ऊसतोडणी टोळ्यांशी करार केले तरच ऊस तोडण्यासाठी कामगार मिळतात. ज्या चाळीस ऊस वहातुकदारांनी उसटोळ्यांशी करार केले होते. त्यातील बहुतांश जनांनी घरातील सोनं घाण ठेऊन तसेच काहींनी मोडून उसटोळ्यांशी करार केले होते. आज त्यांच्या ऊसतोड टोळ्या पळून गेल्याने त्यांना टोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील श्री दत्त शुगर कारखान्याच्या देखील ऊस वाहतुकदारांचा समावेश आहे. ऊस हंगाम जवळ आल्याने वहातुकदारांनी ऊसतोड टोळ्यांना फोन केले असता ते स्विचऑफ लागल्याने वाहतुकदारांनी ऊसतोड टोळ्यांची घरे गाठली मात्र तिथेच कोणीच आढलले नाही. तेथून त्यांनी पलायन केल्याचे समजले. येवढ्या मोठया प्रमाणात ऊस टोळ्या पळून जाण्याचा पहिलीच वेळ असल्याने याचा ऊस गाळप हंगामावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
---------------------
ऊस हंगाम लांबण्याची शक्यता-------
शासनाने साखर कारखाने सुरू करण्यासाठी जाहीर केलेली १५ तारीख आणि परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग यामुळे १५ तारखेला साखर कारखाने सुरू होण्याची आशा धुरूर झाली आहे. जर पावसामुळे ऊसतोडणी कामगार आलेच नाहीत तर कारखान्यांची धुराडी पेटण्यासाठी दिवाळीची वाट पहावी लागणार आहे.
--------------------