भोर ! हिर्डोशीतील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना ट्रॅकसुटचे वाटप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दुर्गम- डोंगरी नीरा - देवघर धरण भागातील हीर्डोशी येथील राजगड ज्ञानपीठच्या समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान व क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्याकडून ट्रॅक सूट वाटप करण्यात आले.यामुळे ट्रॅक सूट वाटप करण्यात आलेले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला होता.
      यावेळी विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ह्या खऱ्या सावित्रीच्या लेकी असून सुमारे २५ किमी अंतरावरून रोज पायपीट करणारे विद्यार्थी देशाचे भविष्य घडवतील असे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपक्रमाचे संयोजक विशाल भेलके, उमेश भेलके,संदीप मोकाटे,अक्षय मोरे,विनोद मोहिते,सुरेश जपे, अजित जगताप,अनिकेत कामठे,गोविंद थरकुडे, जयदीप पडवळ, अजय भुवड, किरण उभे, रमेश उभे, विराज डाखवे, मोहित भेलके विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. गरजुंना मदतीचा संकल्प सोडल्याचे दुर्गम भागात निर्माणच रस्त्यावर करवंद विकणाऱ्या मुली बघितल्या आणि डोळे पाणवले त्या मुलींना मदत करावी असा निर्धार केला आणि आज प्रत्यक्षात तो उतरविला असे कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके म्हणाले.
To Top