भोर ! संतोष म्हस्के ! मोरे कुटुंबाकडून 'हिरा'चा तेरावा : २० वर्षांपासून साथ देणाऱ्या 'हिरा'चा तेरावा घालत शेकडो जणांना केले अन्नदान

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
आत्तापर्यंत माणसाचाच दहावा किंवा तेराव्याचा विधी केला जात होता व पाहुणे तसेच गावातील नागरिकांना अन्नदान केले जायचे.मात्र भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील कर्नावड ता.भोर येथे शेतकरी कोंडीबा धोंडीबा मोरे यांनी चक्क हिरा या बैलाच्या तेराव्या निमित्त गावातील शेकडो जणांना अन्नदान केल्याने परिसरात मोरे यांचे अभिनंदन होत आहे.
      कर्नावड येथील प्रगतशील शेतकरी कोंडीबा (आप्पा)धोंडीबा मोरे यांनी २० वर्षांपूर्वी शेती कामांसाठी खरेदी करून हीरा नावाच्या बैलाला आणले होते. हिराच्या जीवावर त्यांनी वीस वर्ष आपली शेती व्यवसाय चालवला आणि हिरा बैलाने सुद्धा त्यांना वीस वर्षे चांगली साथ दिली. मुलाप्रमाणे जीव लावलेल्या गुणवान बैलाचा त्यांनी तेरावा विधी संपन्न झाला. तेराव्याचे जेवण संपूर्ण गावाला घालण्यात आले. तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी ,नातेवाईक मित्रपरिवार हजर होते.
To Top